Special Report | परळीच्या राजकारणात धनजंय मुंडेंचा पंकजा मुंडेंना धक्का!

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोठा धक्का दिलाय. गोपीनाथराव मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांचे जुने आणि निकटचे सहकारी, तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, ते राष्ट्रवादीत गेले हा आपल्याला धक्का नाही. माझी विनंती आहे की त्या प्रश्नांऐवजी शेतकऱ्यांवर चर्चा करावी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोठा धक्का दिलाय. गोपीनाथराव मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांचे जुने आणि निकटचे सहकारी, तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पंकजा मुंडे आणि भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णांचे सहकारी आज आपल्यासोबत आल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे.

इतकंच नाही तर आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना इशारा दिलाय. वैद्यनाथ कारखानाही ताब्यात घेऊ शकतो. मात्र, आपल्याला तसं करायचं नाही. लढाई करुनच कारखाना ताब्यात घेईन, असा सूचक इशारा धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना दिलाय.

दरम्यान, काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश म्हणजे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, ते राष्ट्रवादीत गेले हा आपल्याला धक्का नाही. माझी विनंती आहे की त्या प्रश्नांऐवजी शेतकऱ्यांवर चर्चा करावी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI