Special Report | रिसॉर्ट सदानंद कदमांचा, मग अनिल परबांनी कर का भरला?-TV9

दापोलीतील याच साई रिसॉर्ट प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परबांची गुरूवारी ईडीकडून तब्बल साडे 13 तास कसून चौकशी झाली. या चौकशीदरम्यान साई रिसॉर्टचे मालक आपण नसून सदानंद कदम असल्याचा दावा अनिल परबांनी केला.

दादासाहेब कारंडे

|

May 27, 2022 | 10:01 PM

दापोलीतील याच साई रिसॉर्ट प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परबांची गुरूवारी ईडीकडून तब्बल साडे 13 तास कसून चौकशी झाली. या चौकशीदरम्यान साई रिसॉर्टचे मालक आपण नसून सदानंद कदम असल्याचा दावा अनिल परबांनी केला. मात्र त्यानंतर लगेचच भाजप नेते किरीट सोमय्यांनी परबांच्या साई रिसॉर्टसंदर्भातील मुरुड ग्रामपंचायतीतील घरपट्टी आणि कर भरल्याची कागदपत्र सादर करत पुन्हा गंभीर आरोप केलेत. 2 मे 2017 रोजी विभास साठेकडून अनिल परबांनी मुरुडमधील गट क्रमांक 446 वरील 42 हेक्टर जमिन खरेदी केली. 19 जून 2019 रोजी विभास साठे आणि अनिल परबांमधील मुरुडच्या जमिन कराराची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली. अनिल परबांनी 26 जून 2019 रोजी ग्रामपंचायतीकडे सदर जमीन आणि त्यावरील बांधकाम आपल्या नावे करून कर आकारणी करण्याचा अर्ज केला. ग्रामपंचायतीनं जमीन आणि त्यावरील मालमत्ता 29 जून 2019 रोजी अनिल परबांच्या नावे करून 1074 घर क्रमांक दिला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें