Special Report | ठाकरे-राणे वाद आणि पवारांचं ते एक वाक्य

Special Report | ठाकरे-राणे वाद आणि पवारांचं ते एक वाक्य

| Updated on: Jul 24, 2022 | 9:39 PM

एकनाथ शिंदेंना झेड सेक्युरिटी नाकारल्याचा आरोप पहिल्यांदा सुहास कांदे यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर राणेंनीही आरोप केले. कोकणातून नारायण राणेंना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता.

मुंबई : वाद सुरु होता…राणे आणि शिवसेनेत. पण या वादात शरद पवारांची(sharad Pawar) एन्ट्री झालीय नितेश राणेंनी(nitesh rane) उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला. आणि पवारांनी मिश्किल हास्य करत उत्तर दिलं. एकनाथ शिंदेंना झेड सेक्युरिटी नाकारल्याचा आरोप पहिल्यांदा सुहास कांदे यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर राणेंनीही आरोप केले. कोकणातून नारायण राणेंना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता. त्याला शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलं होतं. याच वादावर बोलताना पवारांनी नितेश राणेंना टोला मारला. पवार अनेकदा काही जणांना अनुल्लेखानं मारतात. तर काही जणांवर फक्त एका वाक्याची प्रतिक्रिया देऊन विषय संपवतात. नितेश राणेंवर विचारलेल्या प्रश्नावरही पवारांनी हेच केलं. एका वाक्याचं उत्तर देऊन पवार निघून गेले. पण त्या एका वाक्यात टोला होता..टोमणा होता..आणि टीकाही होती.

 

Published on: Jul 24, 2022 09:39 PM