आर्यन खाननं ड्रग्स बाळगले किंवा ते सेवन केल्याचा आरोप हा एक ‘फर्जीवाडा’ होता, हे
अप्रत्यक्षपणे खुद्द एनसीबीच्याच चार्जशीटनं कबूल केलंय. ऑक्टोबरमध्ये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या नेतृत्वात जहाजावर छापा पडला. शाहरुख खानच्या मुलासह १२ जणांना अटक झाली.. देशभर हा विषय गाजला… मात्र तेव्हा ज्याप्रकारे एनसीबीकडून दावे केले जात होते, त्या दाव्यांना एनसीबी पुरावे देऊ शकली नाही… आणि आज आर्यन खाननं ड्रग्स घेतल्याचा पुरावा आमच्याकडे नाही, हे एनसीबीला सांगावं लागलं..आता या प्रकरणात पहिली गोची समीर वानखेडेंची झालीय….अपुऱ्या माहितीवरुन छापा टाकणे, कोऱ्या कागदांवर पंचाच्या स्वाक्षऱ्या घेणे, आरोपींची रक्तचाचणी न करणे, असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत..आणि सूत्रांच्या माहितीनुसार आता केंद्र सरकारनंच समीर वानखेडेंनी टाकलेल्या छाप्याच्या चौकशीचे आदेश दिलेयत.