Special Report | गोपीचंद पडळकरांवर हल्ला करणारा कोण?

गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली तो 25 वर्षांचा तरुण आहे. त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे. सोलापुरातील एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. हा तरुण स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने याआधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात त्याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI