Special Report | महाराष्ट्रात अरुणाचल पॅटर्नची पुनरावृत्ती होणार? अरुणाचल प्रदेशात नेमकं काय घडलं होतं?
एकनाथ शिंदे यांना सरकार टिकवायचं असेल तर दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं जात आहे. 2016 मध्ये अरुणाचल प्रदेशातही असंच राजकारण पाहायला मिळालं होतं. तिथे नेमकं काय घडलं होतं, हे या स्पेशल रिपोर्टमधून समजून घेवूया
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूंकप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 खासदार गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर राज्यात अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं. मात्र, हे सरकार कायद्याच्या चौकटीत टिकणार नसल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून, तसंच विरोधकांकडून करण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांना सरकार टिकवायचं असेल तर दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं जात आहे. 2016 मध्ये अरुणाचल प्रदेशातही असंच राजकारण पाहायला मिळालं होतं. तिथे नेमकं काय घडलं होतं, हे या स्पेशल रिपोर्टमधून समजून घेवूया
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

