Special Report | यूपीच्या निवडणुकीत मोदींऐवजी योगींचा चेहरा? भाजपसाठी संघाची फिल्डिंग?

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा पुढे करुनच लढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर योगी आदित्य नाथ आज राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.

राज्यांमधील स्थानिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला जाऊ नये, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिरात वक्त करण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा पुढे करुनच लढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर योगी आदित्य नाथ आज राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.