Special Report | उत्तर प्रदेशचे विभाजन, अयोध्या एकीकडे, मथुरा दुसरीकडे?

21 मे ते 6 जून दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या राजकारणावर चिंतन झाल्याचं पाहायला मिळालं.

मागील 3 आठवड्यांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारण मोठ्या चर्चेत आहे. 21 मे ते 6 जून दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या राजकारणावर चिंतन झाल्याचं पाहायला मिळालं. या घडामोडी पाहता उत्तर प्रदेशात काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. नेतृत्वबदलापासून सुरु झालेली ही चर्चा उत्तर प्रदेशाच्या विभाजनापर्यंत झाल्याचं सांगितलं जात आहे.