Special Report | व्हायरल ‘शिवलिंगा’चा व्हिडीओ ‘ज्ञानवापी’तला?-TV9

  ज्ञानवापी मशिदीत 3 दिवस सर्वेक्षण झालं. ज्यात 15 तासांची व्हिडीओग्राफी आणि 1500 फोटो काढण्यात आल्यांचं सांगण्यात येतंय. त्यामुळं हा डाटा गोळा करुन, अहवाल तयार करण्यास वेळ लागत असल्यानं, मुदत वाढवून मागण्यात आली होती. त्यानुसार 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

दादासाहेब कारंडे

|

May 17, 2022 | 9:02 PM

ज्ञानवापी मंदिर की मशीद, यावरुन 2 कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी झाली. सुप्रीम कोर्ट आणि वाराणसी कोर्टातून सुनावणी दरम्यान 2 महत्वाचे निर्देश आलेत. ज्ञानवापी मशिदीत झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल देण्यासाठी 2 दिवसांची मुदत वाढ वाराणसी सत्र न्यायालयानं दिलीय. म्हणजे सर्वेक्षणाचा अहवाल 19 मेपर्यंत कोर्टात सादर केला जाईल तर कोर्ट कमिश्नर अजय मिश्रांना हटवण्यात आलंय. त्यांच्यावर मीडियात माहिती लिक केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.  ज्ञानवापी मशिदीत 3 दिवस सर्वेक्षण झालं. ज्यात 15 तासांची व्हिडीओग्राफी आणि 1500 फोटो काढण्यात आल्यांचं सांगण्यात येतंय. त्यामुळं हा डाटा गोळा करुन, अहवाल तयार करण्यास वेळ लागत असल्यानं, मुदत वाढवून मागण्यात आली होती. त्यानुसार 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

इकडे सुप्रीम कोर्टातून मुस्लीम पक्षकारांना झटका बसलाय. वाराणसी सत्र न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाच्या विरोधात, मुस्लीम पक्षानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्स सर्वेक्षणाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलंय की, वाराणसी कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं निर्णयाची प्रतीक्षा करा. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जातोय, तिथं सुरक्षा ठेवली जावी
मात्र नमाज पठण करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिलेत. कोर्टात प्रकरण सुरु असतानाच, शिवलिंगांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
हा व्हिडीओ जर नीट बघा..ज्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण झालं…त्या ठिकाणी जे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केलाय…ते हेच शिवलिंग असल्याचं बोललं जातंय. तिसऱ्या दिवशीचं सर्वेक्षण ज्ञानवापी मशिदीतल्या वजुखान्यात झालं…गोलाकार जे विहीरी सारखं दिसतंय….त्यातच हे शिवलिंग आढळलंय…मात्र हे शिवलिंग खंडीत झाल्यासारखं दिसतंय…
ज्या ठिकाणी हे शिवलिंग आहे, त्याच्या आजबाजूला जर पाहिलं तर पाणीच पाणीच आहे…यासाठी सफाई कर्मचारीही आहेत… एकाच्या हातात पाईप आहे, तो व्यक्ती हा परिसर पाण्याचं साफ करतोय…या संपूर्ण परिसराला वजुखाना म्हणतात, वजुखाना म्हणजे नमाजच्या आधी शरीर स्वच्छ करण्यासाठीची जागा, म्हणजे नमाज पठणासाठी आलेले मुस्लीम बांधव इथं हात पाय धुतात. त्यामुळंच इथं नळ आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलीय,  वजुखान्यातल्या या व्हिडीओनंतर 2 वेगवेगळे दावे होत आहेत..

हिंदू पक्ष म्हणतोय की, ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळलं आणि मुस्लीम पक्षांचं म्हणणं आहे की, ते शिवलिंग नसून पाण्याचा फवारा उडणारा कारंजा आहे. सर्वे टीमचे सदस्य सोहनलाल आर्य यांनी तर, ज्ञानवापी मशिदीत बाबा महादेव आढळले अशी प्रतिक्रिया दिलीय…आणि शिवलिंग आढळताच हर हर महादेवच्या घोषणा देण्यात आल्याचंही सोहनलाल म्हणतायत. आणि मुस्लीम पक्षाचा जो दावा आहे की शिवलिंग नसून फव्वारा अर्थात कारंजा आहे…तर त्या कारंज्याला सुरु करण्याची मागणी केली तेव्हा, त्यांनी ते कारंजा सुरु केला नाही, असंही सोहनलाल यांचं म्हणणंय.वाराणसीत जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. त्याच मंदिराला लागून ज्ञानवापी मशीद आहे..त्यातच आता वाराणसी कोर्टात आणखी एक याचिकाही दाखल झालीय…

ज्या याचिकेत मशिदीच्या पूर्वेकडील नंदी समोरची भिंत तोडण्याची मागणी करण्यात आली
बंद असलेला पश्चिम दरवाजा उघडा अशी मागणी करणारी याचिका सीता, मनू आणि रेखा पाठक यांनी वाराणसीच्या सत्र न्यायालयात केलीय. ज्या नंदीचा उल्लेख झालाय…ते हेच नंदी आहेत..हा नंदी काशी विश्वनाथ मंदिर परिसरातला आहे. कोणत्याही मंदिरात नंदीचं तोंड हे शिवलिंगाच्याच दिशेनं असते. मात्र या नंदीच्या समोर ज्ञानवापी मशीद आहे..त्यामुळं हिंदू पक्षाचं म्हणणं आहे की, ज्ञानवापी मशीद नाही तर मंदीर आहे. आणि आता तर ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगही आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.  मशीद आणि मंदिरावरुन आपआपले दावे सुरु आहेत..मात्र 19 मे ला जो सर्वेक्षणाच्या अहवाल कोर्टात सादर होणार आहे, त्यावर बरंच काही अवलंबून असेल.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें