AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | 5 दिवसात 4 शहरांमध्ये तलवारी कुठून आल्या?-TV9

Special Report | 5 दिवसात 4 शहरांमध्ये तलवारी कुठून आल्या?-TV9

| Updated on: Apr 30, 2022 | 10:58 PM
Share

एकीकडे नेते चिथावणी आणि इशाऱ्यांची भाषा करतायत आणि दुसरीकडे एकापाठोपाठ एक शहरात तलवारींचा साठा जमवला जातोय. महाराष्ट्रात मागच्या फक्त ५ दिवसात ४ शहरांमधून तलवारींचा साठा जप्त केला गेलाय. त्यामुळे खरोखर महाराष्ट्रात काही नवा घातपात शिजवण्याची तयारी सुरु झाल्याची शंका वर्तवली जातेय.

एकीकडे नेते चिथावणी आणि इशाऱ्यांची भाषा करतायत आणि दुसरीकडे एकापाठोपाठ एक शहरात तलवारींचा साठा जमवला जातोय. महाराष्ट्रात मागच्या फक्त ५ दिवसात ४ शहरांमधून तलवारींचा साठा जप्त केला गेलाय. त्यामुळे खरोखर महाराष्ट्रात काही नवा घातपात शिजवण्याची तयारी सुरु झाल्याची शंका वर्तवली जातेय. 27 तारखेला धुळ्यात तलवारींचा साठा जप्त झाला त्यानंतर औरंगाबादेतून तलवारी जप्त झाल्या नंतर जालना, नंतर नांदेडमधून तलवारींचा साठा जप्त झाला आणि आता पिंपरी-चिंचवडमधूनही तलवारी जप्त केल्या गेल्यायत. धुळ्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गस्तीदरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीत 90 तलवारी जप्त झाल्यायत. नांदेडमधून 25 तलवारी जप्त झाल्या, 2 जण अटकेत आहेत. औरंगाबादेत कुरियरद्वारे आलेल्या 37 तलवारींचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आणि पिंपरी-चिंचवडमधून नगर आणि औरंगाबादला पाठवल्या जाणाऱ्या 97 तलवारी कुरियर होण्याआधीच
पोलिसांच्या हाती लागल्यायत. या तलवारी कुणी पाठवल्या, याचा तपास सुरुय. मात्र सत्ताधारी आणि विरोधक यावरुन एकमेकांकडे बोट दाखवतायत.