Special Report | Ajit Pawar यांना सवाल करणारे Yogesh Kedar नेमके कोण? -Tv9
शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, असा सवालच अजित पवार यांनी केला.
शिवनेरी: शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात खडसावले. शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, असा सवालच अजित पवार यांनी केला. आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. त्यांचं आरक्षण रखडवून आम्हाला काय आनंद मिळतो का? काही कायद्याच्या गोष्टी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. आम्ही स्वत: पंतप्रधानांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. सरकारचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. प्रयत्न सुरूच आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं. तसेच ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मराठा तरुणांची मागणीही त्यांनी धुडकावून लावली. शिवनेरी गडावर आज शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजी छत्रपती उपस्थित होते. यावेळी सभेचा कार्यक्रमही झाला. त्यावेळी अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषय छेडून अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. . केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यामुळे अजितदादा काहीवेळ भडकले. त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

