AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO Gaganyaan Mission | चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर इस्त्रोची आणखी एक झेप यशस्वी

ISRO Gaganyaan Mission | चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर इस्त्रोची आणखी एक झेप यशस्वी

| Updated on: Oct 21, 2023 | 12:34 PM
Share

VIDEO | श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 'गगनयान' इस्त्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम यशस्वी, चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर इस्त्रोने आणखी एक झेप यशस्वी केल्याने देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. आलेल्या अडचणींचा सामना करत भारताच्या गगनयानच्या प्री मॉड्यूलची गगनभरारी

हैदराबाद, २१ ऑक्टोबर २०२३ | श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘गगनयान‘ इस्त्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम यशस्वी झाली आहे. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर इस्त्रोने आणखी एक झेप यशस्वी केल्याने देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. आलेल्या काही अडचणींचा सामना करत आज भारताच्या गगनयानच्या प्री मॉड्यूलने अवकाशात गगनभरारी घेतली. या यशस्वी चाचणीनंतर भारताने अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे. दरम्यान खराब हवामानामुळे द फ्लाईट टेस्ट व्हेइकल अबॉर्ट मिशन TV-D1 चाचणीची वेळ दोनदा बदलण्यात आली. क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमसाठी आज होणारी चाचणी खूप महत्त्वाची होती. क्रू मॉड्यूलला अवकाशात पाठवल्यानंतर त्यांना पृथ्वीवर सुरक्षित पाठवायचं कसं? त्यामुळे ही चाचणी खूप महत्वाची होती. मात्र सर्वच निर्धारित निकष आजच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाले आणि TV-D1 व्हेईकल क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमला घेऊन झेपावल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Oct 21, 2023 12:34 PM