AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Board Result LIVE Today: आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?

SSC Board Result LIVE Today: आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?

| Edited By: | Updated on: May 13, 2025 | 11:17 AM
Share

SSC Result Link : आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे.

SSC Board Result 2025 LIVE and Declared Today at TV9 Marathi: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करणार आहे. सकाळी ११ वाजता उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग व लिंगनिहाय निकाल असे तपशील पत्रकार परिषदेत जाहीर केले जातील तर एसएससी निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय होईल. एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता १०वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात – mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, तुम्हाला तुमचा दहावीचा निकाल tv9marathi.com वर पाहाता येऊ शकतो.

दहावीचा निकाल कसा पाहायचा? काय आणि कशी प्रोसेस आहे? हे सोप्पं भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घ्या.

आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा, रिझल्ट लागला की लगेच मेसेज किंवा ईमेलवर तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळणार

नोंदणीसाठी एक बॉक्स दिलाय. रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर या गोष्टी तुम्हाला नोंदणीसाठी लागतील.

Published on: May 13, 2025 09:35 AM