Rajesh Tope | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणारच : टोपे

बारावीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (ssc exam canceled due to corona situation, HSC exam will be held, Tope)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:40 PM, 20 Apr 2021

मुंबई : देशात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहवीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र बारावीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.