Hingoli | हिंगोली बसस्थानकात सलग 30व्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

हिंगोली : बस स्थानकात 30 दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सरुच आहे. पगारवाढीची घोषणा केल्यानंतर एसटीचा संप चिघळला अजून काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, तर काही कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम आहेत. हिंगोलीतील एसटी कर्मचारीही विलीनीकरणावर ठाम आहेत.

हिंगोली : बस स्थानकात 30 दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सरुच आहे. पगारवाढीची घोषणा केल्यानंतर एसटीचा संप चिघळला अजून काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, तर काही कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम आहेत. हिंगोलीतील एसटी कर्मचारीही विलीनीकरणावर ठाम आहेत. गेल्या 30 दिवसांपासून इथल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्यात अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा  7 हजारांच्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकार पुढे काय निर्णय घेतं हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनेक ठिकाणी एसटी सुरू झाल्यानंतर एसटीवर दगडफेकही करण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI