Akola ST Strike | ‘परबसाहेब भरोसा नाय काय’, अकोल्यात भजन करत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

राज्य शासनात विलीनीकरण करावं यासाठी अकोला आगार क्रमांक एक वर गेल्या 29 दिवसापासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. पण अद्याप पर्यंत शासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या गेली नाही.

राज्य शासनात विलीनीकरण करावं यासाठी अकोला आगार क्रमांक एक वर गेल्या 29 दिवसापासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. पण अद्याप पर्यंत शासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या गेली नाही. म्हणूनच आज अकोल्यातील एसटी कामगारांनी याठिकाणी भजन आंदोलन केले आहे आणि या गाण्यातून त्यांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे. यावेळी एसटी कर्मरचाऱ्याच्या व्यथा मांडल्या आहेत. आता तरी देवा आमाला पाव आणि आमचे विलीनीकरण कर अशी मागणी त्यांनी मांडली आहे. आम्ही एसटीचे पुजारी…नित्य करी सेवा…न्याय देई देवा आता न्याय देई देवा आता, परब साहेब एसटी कर्मचाऱ्यांवर  भरवसा नायकाय….हे वाक्य म्हणत राज्यशासनाला साकडे घातले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI