‘साहब के बारे में क्या बोला तूने?’, शिवसैनिकाची कामराला धमकी, ऑडिओ क्लिप अन् शिंदेंवरील ‘ते’ वादग्रस्त गाणं व्हायरल
कुणाल कामरा हा व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये तामिळनाडूत असल्याचे म्हणतो. मात्र कुणाल कामरा पाँडिचेरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यावरून सध्या शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण ते चांगलेच खवळलेले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची मोठी तोडफोड केली. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक काव्य करून त्याची खिल्ली उडवली होती. याप्रकरणीच कुणाल कामराला फोन करून शिवसैनिकांनी शिवीगाळ केल्याचे सांगितले जात असून ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. फोनवर शिवसैनिकांना कुणाल कामरा याने मी सध्या तामिळनाडूत असल्याचे उत्तर दिलं आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या ऑडिओची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही. कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं केलं. दरम्यान, कामराने केलेलं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. यानंतर शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. यानंतर राहुल कनाल आणि कुणाल सरमळकरांकडून थेट ज्या ठिकाणी कामराच्या गाण्याचं शूट झालं त्या हॉटेलमधील स्टुडिओची तोडफोड केली. दरम्यान, हॉटेलच्या तोडफोडप्रकरणी १२ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना जामीन देखील मिळालं.
Published on: Mar 25, 2025 01:19 PM
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
