लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच

लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:55 PM, 10 Apr 2021

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते. तसे सूतोवाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कडक निर्बंध आणि थोडी सूट असे चालणार नाही. नागरिकांना थोडी कळ सोसावीच लागेल, असे उद्धव  ठाकरे म्हणाले.