Marathi News Videos Statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Pimprala area of Jalgaon, Gulabrao Patil participates in the procession

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जंगी मिरवणूक, गुलाबराव पाटील यांनी धरला ठेका, बघा व्हिडीओ
VIDEO | पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, वाजत गाजत शिवरायांची जंगी मिरवणूक अन् मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरला ठेका
जळगाव, ९ ऑगस्ट २०२३ | जळगावाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील उपनगर पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना होतेय. आज महामार्गावरून या पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिरवणुकीपुढे ठेका धरला. यामुळे शिवप्रेमींचा उत्साह वाढलेला दिसून आला. पिंप्राळा येथे महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यासाठी किल्ल्याच्या आकाराचा चबुतराही उभारण्यात आला आहे. तब्बल २० फूट उंच असणारा हा पुतळा धुळे येथील शिल्पकार सरमद पाटील यांनी साकारला आहे.
Published on: Aug 09, 2023 11:58 AM
Related Video
भारताचे 1000 रुपये न्यूझीलंडमध्ये किती होतात? आकडा ऐकून धक्का बसेल
दिग्गज गायिका एस. जानकी यांचे निधन, पद्मभूषण नाकारला होता...
जयंत पाटलांच्या निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, राष्ट्रवादीला धक्का
एका एकरात लाखोंची कमाई, हे 5 पिकं म्हणजे दुसरी लॉटरीच
हॅरी आणि बटरलचा झंझावात, शतक आणि विक्रमासह भारतीय गोलंदाजांची धुलाई
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..