VIDEO : chhagan bhujbal | इम्पेरिकल डेटा आम्ही सादर करतो; निवडणूक थांबवा – छगन भुजबळ

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव 27 टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र ही तांत्रिक बाब आहे. इम्पेरिकल डेटा आम्ही सादर करतो. निवडणूक थांबवा असेही छगन भुजबळ म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली येथे खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासोबत ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेतल्या. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव 27 टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र ही तांत्रिक बाब आहे. इम्पेरिकल डेटा आम्ही सादर करतो. निवडणूक थांबवा असेही छगन भुजबळ म्हणाले. संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे आणि यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI