Varsha Gaikwad यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन, अनेक गाड्यांची तोडफोड
हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक (vikas pathak) यांच्या आवाहनानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहता आणि हजारो संख्येने जमलेले विद्यार्थी पाहता विद्यार्थी खरोखरच हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर रस्त्यावर उतरले की विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई: धारावीत आज विद्यार्थ्यांचा (student) आक्रोश पाहायला मिळाला. ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर गर्दी करत जोरदार आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांचेही धाबे दणादणले. हजारोच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. त्यामुळे धारावीत एकच अफरातफर माजली. या आंदोलनामुळे राज्य सरकारही खडबडून जागे झाले आहे. हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक (vikas pathak) यांच्या आवाहनानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहता आणि हजारो संख्येने जमलेले विद्यार्थी पाहता विद्यार्थी खरोखरच हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर रस्त्यावर उतरले की विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
