Uday Samant | 9 आणि 10 ऑक्टोबरला सीईटीची पुन्हा परीक्षा : उदय सामंत

मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये,  9 आणि 10 ऑक्टोबरला सीईटीची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

ज्या विद्यार्थ्यांना काल आणि आज राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला आहे, अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे मेल करावा, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI