Sudhakar Badgujar : मी तो गुन्हा केलेला आहे; पक्षातून हकालपट्टी, बडगुजर यांची मोठी प्रतिक्रिया
ShivSena Nashik politics : शिवसेना ठाकरे गटातून नाशिक येथील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बडगुजर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षात उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा केलेला आहे, अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिलेली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचे कारण देत बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी केली आहे. त्यांनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गुन्ह्याची शिक्षा पक्षातून हकालपट्टी करण्यात होतं असेल तर त्यावर मी काय बोलणार? असंही त्यांनी यावेळी म्हंटलं.
बडगुजर यांनी काल पक्षातील संघटनात्मक बदलात आपल्याला विचारात घेतलं नाही म्हणून नाराज असल्याची भावना व्यक्त केली होती. बडगुजर हे संजय राऊत यांचे राईट हँड समजले जायचे. गेल्याच आठवड्यात बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील भेटले होते. त्यानंतरच त्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती. आज नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा फोन आला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्यानं बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

