Sudhir Mungantiwar | अध्यादेश काढला तर निवडणूक पुढे ढकलता येते- सुधीर मुनगंटीवार

ओबीसी आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. अध्यादेश न काढता गेलात तर निवडणुका पुढे ढकलता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

मुंबई : ओबीसी आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. अध्यादेश न काढता गेलात तर निवडणुका पुढे ढकलता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. कायदे आपणच तयार करतो. अध्यादेश काढला तर निर्णय सोपा होईल. कोरोना काळ अथवा कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा राज्याचा अधिकार अबाधित असल्याचेही मत कोर्टाने नोंदविले आहे. त्यामुळे विद्यमान कायद्याद्वारे हे शक्य नसून अध्यादेश आवश्यक आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI