राऊत यांच्या ‘त्या’ टीकेवर भाजपनेता भडकला, केली थेट हिटलरच्या सहकाऱ्याशी तुलना
सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनानंतर आता राजकीय तापमान वाढत आहे. त्यांच्या आत्महत्येवरून सध्या तपास सुरू असतानाच आता बॉलिवूड अभिनेता तथा खासदार सनी देओलवरून पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलं आहे.
मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | बॉलिवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काही दिवसांपुर्वी कर्जाच्या बोझ्यामुळे आत्महत्या केली. त्यांनी त्यांची जीवनयात्रा ही त्यांच्या स्टुडिओतच संपवली. तर त्यांनी याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे मदत मागितली होती. मात्र त्यांना ती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी दिल्लीवरून येते आत्महत्या केली. याचदरम्या भाजप नेते खासदार सनी देओल यांना आलेल्या जप्तीच्या नोटीवरून नितीन देसाई हे प्रकरण पुन्हा समोर आले असून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
त्यांनी, सनी देओलला एक न्याय आणि नितीन देसाई यांना एक न्याय असं का असा सवाल उपस्थित केला आहे. तर सनी देओलला हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत म्हणूनच दिल्लीतून सुत्र हालली आणि त्यांच्या घराचा लिलाव हा पुढे ढकला असा आरोप केला. त्यावरून भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटावार केला आहे.
मुनगंटीवार यांनी ज्याला देसाई आणि सनी देओल यांच्या प्रकरणाबाबत माहित नाही अशाने हा आरोप केला आहे. हे मजेशीर असल्याचा टोला लगावला आहे. तर या आरोपामध्ये त्यांची सत्तेची भूक दिसते. या आरोपामध्ये सत्तांध पक्षाचा सत्तांध नेता दिसतो असाही घणाघात केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

