Sudhir Mungantiwar | ‘अस्थिर मनाने राऊत काहीही भाष्य करू शकतात

आम्ही आमदारांना मतदार संघात लक्ष द्यायला सांगीतले आहे. आज मंत्रालय कोमात गेले आहे. आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्या. मुंबईत गरज पडल्यास यावे लागेल.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 28, 2022 | 12:47 PM

राज्यात जशी जशी अस्थिरता वाढेल तसे त्यांची अनेक वक्तव्ये येतील. जेवढे दिवस आवश्यकता असेल तोपर्यंत वेट आणि वॅाचची भूमिका घेणार असल्याचे सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले. आम्ही राज्यातील परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहोत. मविआने आत्मपरिक्षण करावे. बहुमत आहे की नाही याबद्दल त्यांनी विचार करावा. महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सामना हे शिवसेनेचे पाँप्लेट आहे. त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. नाहीतर त्याचा देखील खप वाढेल. आम्ही आमदारांना मतदार संघात लक्ष द्यायला सांगीतले आहे. आज मंत्रालय कोमात गेले आहे. आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्या. मुंबईत गरज पडल्यास यावे लागेल.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें