Suhas Kande | आम्ही बंडखोरी नाही, उठाव केला आहे : सुहास कांदे
राज्यातील सत्ता संघर्षानंतर युवासेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून एकनाथ शिंदे आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मांमदमध्ये शिवसंवाद मेळावा घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे
राज्यातील सत्ता संघर्षानंतर युवासेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून एकनाथ शिंदे आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मांमदमध्ये शिवसंवाद मेळावा घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या मेळाव्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. मात्र दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहरात पोस्टरबाजी केली असून दुसरीकडे मेळावा देखील घेणार आहेत. आज ते आदित्य ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी काही वेळापुर्वी बोलताना सांगितले आहे. आम्ही बंडखोरी केली नाही उठाव केला आहे. आम्ही आदित्य ठाकरेंचा आदर करतो. हिंदुत्व विरोधकांना सुरक्षा दिली पण एकनाथ शिंदेना दिली नाही. शंभुराज देसाईंना वर्षावरुन फोन आला शिंदेनंना सुरक्षा द्यायची नाही. हे असं का होत आहे.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?

