Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी झेंडा; अजित पवारांचा ऐतिहासिक रेकॉर्डही मोडला
महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असताना बारामती विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच परंपरेला पुढे नेत सुनेत्रा पवार यांनी मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव करत 1 लाख 65 हजार मताधिक्य मिळवले होते, जो आतापर्यंतचा राज्यातील सर्वात मोठा विक्रम होता.
मात्र, चालू मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम मोडीत काढला आहे. 19 व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, त्या तब्बल 1 लाख 68 हजार मतांनी आघाडीवर आहेत. एका पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या फरकाने आघाडी घेणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या उमेदवार ठरत आहेत. या निकालातून बारामतीकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर आणि विशेषत: सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असल्याचे स्पष्ट होत आहे.
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!