Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 11 November 2021
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या आंदोलनावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत रात्र काढली. निर्णय होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
Latest Videos
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

