अंधरे पोटनिवडणुकीसह ग्रामपंचायतींचा थरार पहा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 17, 2022 | 5:20 PM

हाती आलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत 98 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. विशेष बाब म्हणजे राज्यातील 1165 ग्रामपंचायतींपैकी 96 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत.

राज्यातील 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडी तील पक्षांमध्ये चुरस पहायला मिळाली. यावेळी भाजप-शिंदे गटाला राज्यातील 342 तर महाविकास आघाडीला 355 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडवता आला आहे. तर राज्यात झालेल्या 1165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत सगळ्यात मोठा गट ठरला आहे. तर हातात आलेल्या निकालावरून राज्यातील 230 ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलले आहे. तर यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची पिच्छे हाट झाली असून काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. काँग्रेसने राज्यातील 134 ग्रामपंचायतींवर पंजा मारला आहे. तर घड्याळाला 100 ही गाठता आलेलली नाही. हाती आलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत 98 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. विशेष बाब म्हणजे राज्यातील 1165 ग्रामपंचायतींपैकी 96 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI