SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 25 September 2021

भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून 629 रँकने उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

भारतीय लोकसेवा आयोग- यूपीएससीच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून 629 रँकने उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

दुसऱ्यांदा UPSC परीक्षेत यश

गेल्यावर्षी ते यूपीएसी परीक्षेत भारतीय पातळीवरून 752 रँकने उत्तीर्ण झाले होते. संरक्षण सहाय्यक नियंत्रक पदी त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या त्यांची ट्रेनिंग सुरु आहे.सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री केशवराज विद्यालय येथे तर माध्यमिक शिक्षण श्री देशिकेंद्र विद्यालय लातूर येथे झाले आहे. ते आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनीरिंग मध्ये बी. टेक.आणि एम.टेक.झाले आहेत. त्यानंतर त्यांनी गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेड मध्ये इंटर्नशिप केली. बेंगलोर येथे झीनोव्ह कन्सल्टन्सी कंपनीमध्ये “सहयोगी कंन्सलटन्ट” म्हूणन सेवेत असताना त्यांना आपल्या कार्याच्या मर्यादा लक्षात आल्या त्यामुळे ते यूपीएससीकडे वळले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI