AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 27 October 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 27 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 8:24 AM
Share

सुटणा तालुक्यातील अंबासन येथील दादाजी भामरे यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन 2 एकरामध्ये फुलकोबीची लागवड केली होती. फुलकोबी जोमात आला होता. वेळोवेळी औषध फवारणी, मशागतीची कामेही केली होती. मात्र, ऐन फळलागवडीच्या दरम्यानच फुकोबीला घडच लागले नाहीत. कंपनीचे बियाणेच बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने आता झालेले नुकसान कसे फरुन काढावे हा प्रश्न भामरे यांच्यासमोर आहे. यासंबंधी त्यांनी कंपनीकडे तक्रारही केली मात्र आता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

संकट आली की ती चौहीबाजूने येतात असाच काहीसा प्रकार सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीपातील पिकांचे तर नुकसान झालेलेच आहे पण यातून सावरण्यासाठी भाजीपाल्याची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या पदरीही निराशाच पडलेली आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पण याला ना निसर्गाची साथ मिळतेय ना बियाणे विक्री करणाऱ्यांची. तब्बल दोन एकरात लागवड केलेल्या (cauliflower, crop ) फुलकोबीचे बियाणेच बोगस निघाल्याने एका शेतकऱ्याला या पिकावर रोटर फिरवावा (Bogus seeds) लागला आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेला खर्च तर वाया गेलाच शिवाय दोन महिन्याची मेहनतही लयाला गेली आहे.

सुटणा तालुक्यातील अंबासन येथील दादाजी भामरे यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन 2 एकरामध्ये फुलकोबीची लागवड केली होती. फुलकोबी जोमात आला होता. वेळोवेळी औषध फवारणी, मशागतीची कामेही केली होती. मात्र, ऐन फळलागवडीच्या दरम्यानच फुकोबीला घडच लागले नाहीत. कंपनीचे बियाणेच बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने आता झालेले नुकसान कसे फरुन काढावे हा प्रश्न भामरे यांच्यासमोर आहे. यासंबंधी त्यांनी कंपनीकडे तक्रारही केली मात्र आता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

Published on: Oct 27, 2021 08:24 AM