AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super Fast News | महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा, सुपरफास्ट 50 न्यूज

Super Fast News | महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा, सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Mar 26, 2023 | 8:26 AM
Share

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमिवर केंद्राकडून मार्गदर्शक तत्व जाहीर. 10 आणि 11 एप्रिलला राज्यातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील करण्यात येणार आहे

सुपरफास्ट 50 न्यूज : राज्यात कोरोनाचा आकडा वाढला. राज्यात गेल्या 24 तासात 437 रूग्णांची भर तर 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत 105 कोरोना रूग्ण. तर वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमिवर केंद्राकडून मार्गदर्शक तत्व जाहीर. 10 आणि 11 एप्रिलला राज्यातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील करण्यात येणार आहे. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आले आहे. परभणीतील उसाचे उत्पन्न घटल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे याचा फटका कारखान्यांना बसला आहे. यंदा गाळप क्षमता वाढवून कारखाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र उसाची आवक कमी झाल्याने कारखान्याचं आर्थिक समीकरण बिघडल्याचे समोर येत आहे. तर पुणे जिल्ह्यातील साखर उतारा ही पाऊन टक्क्यांनी घटला आहे. पुणे जिल्ह्यातील 17 पैकी नऊ कारखान्यांची धुराडी बंद आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीनंतर आथा उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबूची मागणी वाढली आहे. याचा परिणाम लिंबू दरावर झाला असून दरातही काहीशी वाढ झाली आहे. यासह राज्यातील इतर बातम्यांचा घ्या आढावा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये

Published on: Mar 26, 2023 08:26 AM