Sharmila Thackeray : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनसेला साथ द्या, शर्मिला ठाकरेंची साद
सभागृहाच्या बाहेर झालेल्या धक्काबुक्कीचाही त्यांनी निषेध केला. राजकारण किती खालच्या स्थराला गेले आहे त्याचे हे उदाहरण होते. सभागृहाचे देखील गांभीर्य यांना राहिलेले नाही. जर असे असेल तर आगामी निवडणुकांमध्ये कुस्ती खेळणारे पैलवानच सभागृहात पाठवा, असा टोलाही त्यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
मुंबई : (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण कोणत्या स्टेजला गेले आहे हे सबंध जनता पाहत आहे. केवळ स्वार्थासाठी जो-तो राजकारण करतोय, जनतेच्या हीताचे कुणाला काही राहिलेले नाही. मध्यंतरीचे सत्तांतर असो की त्यापूर्वीचे सरकार या दोन्हीमध्ये जनतेच्या पदरी काही पडले याचे कुणालाही काही राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे भवितव्य आणि विकास कामे साध्य करायची असतील (MNS) मनसेच्या नाव नोंदणी पक्रियेत सहभागी व्हा असे आवाहन शर्मिला ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे सभागृहाच्या बाहेर झालेल्या धक्काबुक्कीचाही त्यांनी निषेध केला. राजकारण किती खालच्या स्थराला गेले आहे त्याचे हे उदाहरण होते. सभागृहाचे देखील गांभीर्य यांना राहिलेले नाही. जर असे असेल तर आगामी निवडणुकांमध्ये कुस्ती खेळणारे पैलवानच सभागृहात पाठवा, असा टोलाही त्यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. महाराष्ट्रसाठी मराठी आणि देशासाठी हिंदुत्व हीच (Raj Thackeray) राज ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मनसे केव्हाही हिंदुत्वापासून दूर गेलेली नाही असेही शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

