Ashok Patil | अशोक पाटील यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय – tv9
माजी आमदार अशोक पाटील यांनी, गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक वेळेस आपला अपमान केला जात होता. त्यामुळे मी नाराज झालो आहे. तर कोळी समाजाचे आणि भांडुप परिसरामध्ये 80% स्लमच्या समस्या सोडविण्यासाठीसह बाळासाहेबांचा स्वप्न साकार करण्यासाठी आपण शिंदे गटात सहभागी झाल्याचे पाटील म्हणाले.
राज्यातील राजकीय सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारचं अडचणीत येणार की काय अशी स्थिती आहे. तर सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर सध्या तारिख पे तारिख मिळत आहे. यादरम्यान मात्र सत्ता धारी शिंदे गटा इनकमिंग सुरू आहे. तर शिवसेनेतील आऊटगोईंग काही थांबता थांबेना. आता शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या भांडुपमधील माजी आमदार अशोक पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भांडुपमध्येही शिवसेनेला खिंडार पाडण्यात शिंदेंना यश आल्याचे दिसत आहे. दरम्यान माजी आमदार अशोक पाटील यांनी, गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक वेळेस आपला अपमान केला जात होता. त्यामुळे मी नाराज झालो आहे. तर कोळी समाजाचे आणि भांडुप परिसरामध्ये 80% स्लमच्या समस्या सोडविण्यासाठीसह बाळासाहेबांचा स्वप्न साकार करण्यासाठी आपण शिंदे गटात सहभागी झाल्याचे पाटील म्हणाले.
Published on: Aug 23, 2022 09:51 AM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
