Local Body Elections 2026 Deadline : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली! कोर्टाचा आदेश काय?
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणासह इतर प्रकरणांमुळे यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत. कोर्टाने निवडणूक आयोगाला नोव्हेंबर २०२५ पर्यंत आवश्यक मशीन पुरवण्याचेही निर्देश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश देत थेट अंतिम मुदत निश्चित केली आहे. सरकारच्या वकिलांनी ओबीसी आरक्षण आणि इतर प्रलंबित प्रकरणांमुळे यावर्षी निवडणुका होऊ शकले नाहीत, असे कोर्टाला सांगितले. कोर्टाने निवडणूक आयोगाला नोव्हेंबर २०२५ पर्यंत आवश्यक असलेली इव्हीएम मशीन पुरवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सर्व प्रभाग रचना पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सरकारने तयारी करणे आवश्यक आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

