Local Body Elections : ‘स्थानिक’ निवडणुकांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, निवडणुकीला स्थगिती की नाही?
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला आहे. 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली असली तरी निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार. या ठिकाणांवरील निकाल अंतिम निकालाच्या अधीन असतील. पुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका निर्धारित वेळेनुसारच पार पडतील. एकूण 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये 57 ठिकाणी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. यामध्ये 40 नगरपरिषदांचा समावेश आहे. मात्र, न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया थांबवणे योग्य नाही असे स्पष्ट करत या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. ज्या 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या ठिकाणांवरील निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

