सर्वोच्च न्यायालयाने ED च्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करावी : Nana Patole
राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडीमधील (MVA) घटक पक्षाचे नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडीमधील (MVA) घटक पक्षाचे नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे. दान गुप्त ठेवा उघड करू नका नाही तर ईडी (ED) मागे लागते असा उपरोधिक टोला नाना पटोले यांनी आज लगावला. गोंदियातील कुनबी मेळाव्याच्या जाहीर सभेत नाना पटोले बोलत होते. भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला एप्रिल फुल बनवले आहे, दररोज देशातील जनता एप्रिल फुल बनून जगत आहे. ज्या घोषणा भाजपवाले करून केंद्रात सत्तेवर आले आहेत. त्या सर्व घोषणा विसरून त्यांनी जनतेला एप्रिल फूल बनवलं आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ED च्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....

