AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार संसदेत बिल; थेट सांगूनच टाकलं!

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार संसदेत बिल; थेट सांगूनच टाकलं!

| Updated on: Jun 06, 2026 | 3:37 PM
Share

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, निवडणुकीत घोडेबाजार झाल्याच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असताना, विरोधकांनी मात्र उमेदवारांना आर्थिक अमिषे आणि दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, निवडणुकीत घोडेबाजार झाल्याच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असताना, विरोधकांनी मात्र उमेदवारांना आर्थिक अमिषे आणि दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर संकेत दिले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी पुरावे देईन,” असा इशारा दिला.

निवडणूक बंद करा नाहीतर ओपन वोटिंग ठेवा, बिल संसदेत आणेन असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, घोडेबारासारखे उद्योग बंद झाले पाहिजेत, असं म्हणत सुळे चांगल्याच संतापल्या मी आयोगात जाईल, वेळ पडली तर कोर्टात देखील जाईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलंय.  महाविकास आघाडीला ‘माघार आघाडी’ म्हणत सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही भाजपविरोधात ताकदीने लढलो आहोत आणि पुढेही लढत राहू. मात्र विधान परिषद निवडणुकीत जे घडलं, त्याची माहिती सर्वांनाच आहे. “कोण काय आणि कसं झालं, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. सुळे यांनी पुढे सांगितले की, या निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होईल, अशी अपेक्षा नव्हती. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि कोणत्याही निवडणुकीत पैशांचा वापर, तसेच केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवून दबाव टाकला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

घोडेबाजार रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, यासंदर्भात विधेयक आणण्याचा विचार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jun 06, 2026 02:41 PM

Follow Us