“गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिलं, तर सांभाळून राहा”, सुप्रिया सुळे यांनी कोणाला दिला सल्ला?

“गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिलं, तर सांभाळून राहा”, सुप्रिया सुळे यांनी कोणाला दिला सल्ला?

apeksha sakpal | Updated on: Jun 13, 2023 | 9:25 AM

"राज्यातील गद्दार सरकारची एनिवर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला तिकीट दिले गुवाहाटीला जाण्याचे, तर सांभाळून रहा", असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदार संघातील लोकांना दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

पुणे : “राज्यातील गद्दार सरकारची एनिवर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला तिकीट दिले गुवाहाटीला जाण्याचे, तर सांभाळून रहा”, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदार संघातील लोकांना दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. “रेडिसन हॉटेलमध्ये राहण्याचे निमंत्रण दिले तर सांभाळून राहा, विचार करा. गद्दारांना खाजगी हॉटेल लागले, प्रायव्हेट खाजगी विमान सुद्धा लागले. गद्दारी करताना कोणालाही असे वाटले नाही की आपल्या मतदारसंघात जावे लोकांना विचारावे. गावभेटी घ्याव्यात लोकांना सांगावे हा मी निर्णय घेतोय तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा का असे एखाद्याने सांगितले नाही. तुम्ही पक्ष बदलत आहे. विचारधारा बदलता, सरकार पाडता एकदा तुम्हाला वाटलं नाही लोकांना विश्वासात घ्यावे असे का वाटले नाही? तिकडे गुवाहाटीमध्ये एकमेकांना मिठ्या मारता, शॉर्ट कपडे घालता तुम्ही सुट्टीला गेला होता की देशाच्या सेवेसाठी गेला होता? कालच एक बातमी ऐकली की भारतीय जनता पक्षाने शिंदे सरकारला सांगितले आहे की तुमचे पाच मंत्री काढून टाका. मी विचार करते काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष सत्तेत होती.उद्धवजी म्हणायचे की हे मिंधे सरकार आहे. ती आता मला आता पटू लागले आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Published on: Jun 13, 2023 9:25 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us