भाजपविरोधात बोलतील त्यांना ईडीची नोटीस
अनिल देशमुख, अनिल परब आणि नवाब मलिक यांना नोटीस पाठवण्यात आली कारण हे नेते जोरदारपणे भाजपला विरोध करत होते त्यामुळे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
जे नेते भाजप विरोधात बोलतील त्यांनाच फक्त ईडीकडून नोटीस पाठवली जाते, आणि जे नेते भाजपचे ऐकतात, त्यांच्या विरोधात बोलत नाहीत त्यांना भाजप ईडीची नोटीस पाठवत नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ते राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस पाठवून चौकशी करण्यात आल्यानंतर त्या घटनेची निषेधही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. त्यांनी यावेळी अनिल देशमुख, अनिल परब आणि नवाब मलिक यांना नोटीस पाठवण्यात आली कारण हे नेते जोरदारपणे भाजपला विरोध करत होते त्यामुळे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
Published on: Jun 15, 2022 08:45 PM

