राहुल गांधींकडे राजकीय परिपक्वता नाही; बाजप नेत्याची टीका
तावडे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवानी यांना परदेशात भारताबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी समजूतदारपणा दाखवला
कराड (सातारा) : सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना शिक्षा सुनावली. पण त्यांना ती मान्य नाही. ते न्यायालयाचा निर्णय मी मानणार नाही, अस वक्तव्य करत आहेत. त्यांच्यात राजकीय परिपक्वता दिसत नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली. ते सातारा कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी तावडे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवानी यांना परदेशात भारताबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी समजूतदारपणा दाखवला. त्यांनी आपण भारतात परतल्यावर त्यावर भाष्य करू असे म्हटलं होतं. पण राहुल गांधी परदेशात भारताविरोधी वक्तव्य करतात. यावरून त्यांच्याकडे समजूतदारपणा नसल्याचे दिसले. त्यांच्या अशा अनेक घटनांमुळे या नेतृत्वाखाली विरोधक लोकसभा निवडणुकीचा सामना कसा करणार, अशी खिल्ली तावडे यांनी उडवली.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

