पुण्याच्या पुरात सुषमा अंधारे यांनी केली पाहणी, प्रशासनावर केली टिका
पुण्यात मुसळधार पावसाने कहर केला असताना खडकवासला धरणाचे पाणी सोडण्यात आले. धरणाचे पाणी सोडणार याची कोणतीही कल्पना नागरिकांना नव्हती असा आरोप होत आहे. पुणे उत्तरेकडील विश्रांतीवाडीच्या शांतीनगरात शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी पाणी साचलेल्या भागात दौरात करीत पाहणी केली आणि प्रशासनाला धारेवर धरले.
पुण्यात पावसाने कहर केल्याने खडकवासला धरणाचे दरवाजे रात्री अचानक उघडण्यात आल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात मुळशी, खडकवासला धरण भरुन वाहू लागण्याने पुणे जलमय झाले आहे. पाऊस सुरु असल्याने येथील सिंहगड परिसरात रस्त्यावर पाणी भरल्याने लष्कराला पाचारण करावे लागले. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यातील एकतानगर भागात पाहणी केली आणि प्रशासनाच्या सुरु असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला. यावेळी लष्कराच्या जवानांनी पुण्यातील पुर आलेल्या परिसरातून अनेक नागरिकांची सुटका केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विश्रांतवाडीतील शांतीनगर आणि भारत नगर परिसरात दौरा केला आणि नागरिकांशी बोलून परिस्थितीचा अंदाज घेतला. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पुर येत असतो तरीही येथील लोकांसाठी कायम स्वरुपी पर्याय शोधलेला नाही असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Published on: Jul 25, 2024 08:26 PM
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?

