Sushma Andhare | देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? अशोक खरात प्रकरणी सुषमा अंधरेंच टीकास्त्र नेमकं कुणावर?
सध्या राज्यभर खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर अनेक नेते भाष्य करत आहेत. नुकतीच सुषमा आंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अशोक खरातच्या अघोरी पद्धतीबाबत तसेच मुख्यमंत्र्यांच्या फोटोवरील फुल्यांवर स्पष्ट मत मांडले.

माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘काही लोक दबक्या आवाजात बोलत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील फुल्या मारल्या गेल्या आहेत. फुल्या मारण्याचे प्रकरण काय आहे, याची आम्हाला कल्पना नाही. अशोक खरातच्या हातून कोणी अघोरी विद्या करू पाहत आहे का? तो नक्की कोण आहे? असे सवालही अंधारे यांनी विचारले. खरात प्रकरणात दीपक केसरकर अनेक महत्त्वाच्या कड्यांमधली एक कडी आहेत. दीपक केसरकर यातून पळ काढू शकत नाही. दीपक लोंढे हा आर्थिक व्यवहार सांभाळत होता आणि तो केसरकर आणि खरातसोबत होता, असेही अंधारे म्हणाल्या.
Published on: Apr 06, 2026 05:24 PM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ