Ranjeet Kasle : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांच्या दाव्याने खळबळ
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्यासाठी ५ ते ५० कोटी रूपयांची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा मोठा गौप्यस्फोट बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर होती, असा दावा देखील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला ५ ते ५० कोटी रूपयांची ऑफर दिली होती, अशी माहिती देत असताना त्यांनी पुढे असेही सांगितले की,
‘अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. मी म्हणालो, हे पाप माझ्याकडून होणार नाही. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, अशी ऑफर दिली जाते. तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या विभागाला बोलावून घेतले जाते.’, असं कासले म्हणाले. दरम्यान, निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘विक्षिप्त माणूस आहे. अधिकारी असताना का कारवाई केली नाही?’, असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

