Pune Shivshahi Rape Case : स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा राजकीय बॅनरवर फोटो, ‘या’ माजी आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर दत्तात्रय गाडे याचा फोटो असून अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये त्याचा फोटो देण्यात आला आहे. तर गाडे याचे हितसंबंध नेमके कोणाशी आहे, याची चौकशी करा अशी मागणी अशोक पवार यांनी केली आहे
स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा एका राजकीय बॅनरवर फोटो दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात एसटीच्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर एका नराधमाकडून बलात्कार करण्यात आला. या नराधमाचं नाव दत्तात्रय गाडे असं असल्याचे समोर आले आहे. अशातच आता समोर आलेल्या एका मोठ्या माहितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिरूरमधील राजकीय बॅनरवर आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीचा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या एका राजकीय बॅनरवर दत्तात्रय गाडे यांचा फोटो दिसून आला आहे. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर दत्तात्रय गाडे याचा फोटो असून अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये त्याचा फोटो देण्यात आला आहे. तर गाडे याचे हितसंबंध नेमके कोणाशी आहे, याची चौकशी करा अशी मागणी अशोक पवार यांनी केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. आरोपी दत्तात्रय गाडेचा राजकीय बॅनरवर फोटो दिसून आल्याने आता काही राजकीय कनेक्शन सुद्धा समोर आले आहेत. यासोबत दत्तात्रय गाडेच्या व्हॉट्सअॅपच्या डीपीवर आमदार माऊली कटकेचा फोटो आहे. आरोपी दत्तात्रय गाडे गावात आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता म्हणून फिरत असायचा अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

