AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर कारवाई करा, Tulip Miranda यांची मागणी

| Updated on: Jul 04, 2021 | 10:04 PM
Share

रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्याची नोटीस त्यांना 2017 साली पाठवण्यात आली होती. (Take action on Amitabh Bachchan's waiting bungalow, Tulip Miranda demands)

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी पालिकेकडे पत्र लिहून केली आहे. सर्वसामान्य लोकांची घर तोडता मग बच्चन याना वेगळा न्याय का? सवालही कॉग्रेस नगरसेविकेने केला आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरी सर्वेक्षण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करता येईल, असे प्रतिउत्तर पालिकेने दिले आहे. रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्याची नोटीस त्यांना 2017 साली पाठवण्यात आली होती. 2019 मध्ये मुंबई महापालिकेने बंगल्याची हद्द सूचित करणारी भिंत हटवण्यात आली होती. मात्र त्यांच्या बंगल्याला काहीही करण्यात आलं नव्हतं. काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आणलं आहे.