भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा पक्षाला रामराम…
तमिळनाडू भाजपमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णामलाई यांनी पद सोडल्यानंतर आता पक्षातील अनेक नेत्यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे.
तमिळनाडू भाजपमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णामलाई यांनी पद सोडल्यानंतर आता पक्षातील अनेक नेत्यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राज्यातील भाजप संघटनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे तमिळनाडू उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय आणखी किमान 15 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अण्णामलाई यांच्या नेतृत्व बदलानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाच्या निर्णयांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे तमिळनाडूमध्ये भाजपसमोर मोठे संघटनात्मक आव्हान निर्माण झाले असून आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाची चिंता वाढली आहे.
Published on: Jun 06, 2026 02:03 PM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर

