Tejas Thackeray : तेजस ठाकरे राजकारणात येणार? शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात तिसरे ठाकरे मैदानात?
आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एन्ट्रीची चांगलीच चर्चा आहे. तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमात आतापर्यंत फारसे दिसले नाहीत. पण, ठाकरे कुटुंबातील आदित्य, अमित यांच्यानंतर राजकारणात तेजस ठाकरेंची चर्चा आहे.
मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यानंतर तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन संघर्षाच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शेवटचं अस्त्र बाहेर काढल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन वेगळा मार्ग निवडल्यानं ठाकरेंना मोठा धक्का बसला. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. आमदार-खासदारांनंतर शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदेंकडे जात असल्यानं ठाकरे घराणं त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहे. अशातच आता तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंचे पूत्र तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, याला कारण ठरत आहे ती तेजस ठाकरेंची सार्वजनिक कार्यक्रमातली उपस्थिती.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता

