AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Brothers Banners : मुंबई आपली अन् इथे...  दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर मुंबईत झळकले

Thackeray Brothers Banners : मुंबई आपली अन् इथे… दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर मुंबईत झळकले

| Updated on: Sep 30, 2025 | 5:22 PM
Share

यंदाही दोन शिवसेना दसरा मेळावे होणार असून, त्यापूर्वी मुंबईत ठाकरे बंधूंचे बॅनर लागले आहेत. दादर टीटी आणि लालबाग परळ परिसरात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकले. राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार का, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

यावर्षीही शिवसेनेचे दोन दसरा मेळावे आयोजित केले जाणार आहेत. यापैकी एक मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटर, तर दुसरा ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणार आहे. मात्र, या मेळाव्यांपूर्वी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जात आहे. दादर टीटी आणि लालबाग परळ परिसरामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्रित फोटो लावण्यात आलेले आहेत.

राज ठाकरे हे दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील अशी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे. संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे दसरा मेळाव्याला येणार का, यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. अवघे दोन दिवस दसरा मेळाव्याला उरले असताना, ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांना निमंत्रण दिले जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यापूर्वीच दोन्ही भावांचे एकत्रित बॅनर मुंबईत लक्ष वेधून घेत आहेत.

Published on: Sep 30, 2025 05:22 PM